Delete App Data Permanently: मोबाईलमधून एखादं एप्लिकेशन्स हटवलं की वाटतं, ‘झालं! आता स्टोरेज रिकामं!’ पण हे फक्त वरवरचं आहे.
आपण पाहुणे घरी गेले तरी त्यांचं सामान मागे राहतं तसं, अॅप्स uninstall केल्यानंतर त्यांचा डेटा—cache, फोल्डर्स, इमेजेस—फोनमध्येच रहातो. हा लपलेला डेटा तुमच्या स्टोरेजला भरतो, मोबाइल स्लो करतो, आणि कधीकधी सुरक्षा जोखीमही वाढवतो.
तर मग, अॅप हटवणं पुरेसं नाही. खरंच स्वच्छतेसाठी काय करावं?
चला, बघूया की फक्त 3 सोप्या स्टेप्समध्ये मोबाईलचा डेटा पूर्णपणे साफ कसा करावा.
Delete App Data Permanently
समजून घ्या – Uninstall म्हणजे Data Delete नाही
आजाराचा मुळापासून बंदोबस्त गेला पाहिजे.
फक्त अॅप uninstall केलं तरी cache files, डाउनलोड केलेली माहिती किंवा folders मागे राहतात.
हेच fragments स्टोरेजला भरतात आणि फोन स्लो करतात.
Android वापरकर्त्यांसाठी 3 सोप्या स्टेप्स
1. Uninstall करण्याआधी Data & Cache Delete करा
Settings → Apps → संबंधित अॅप निवडा
Storage → Clear Cache & Clear Data
मग Uninstall करा.
या स्टेपमुळे 'blank slate' मिळतो; अनावश्यक माहिती आधीच हटते.
2. File Manager वापरून बाकी उरलेलं साफ करा
File Manager → Internal Storage → Android → Data/Obb
‘com.appname’ सारखे फोल्डर्स शोधा आणि Delete करा.
काही अॅप्स uninstall नंतरही फोल्डर्स ठेवतात – हे खरं ‘छुपं कचरा’ आहे!
3. एकदा Junk Cleaner ने स्कॅन करा (Optional, पण उत्तम)
Google Files, CCleaner, AVG Cleaner यांसारखी अॅप्स वापरा.
हे Hidden Files, Junk व Logs शोधतात आणि साफ करतात.
iPhone वापरकर्त्यांसाठी -Delete App” म्हणजेच पूर्ण data delete.
iPhone मध्ये Offload केलं, तरी app चा डेटा राहतो.
काय करावं?
Settings → iPhone Storage → Delete App
Files अॅप → Documents/App फोल्डरमध्ये राहिलेल्या फाइल्स delete करा.
iCloud Drive मध्येही check करा – backup data तिथं असू शकतो.
Cloud Backup विसरू नका!
App चा डेटा Google Drive, iCloud, किंवा Dropbox वर backup झाला असल्यास,
त्या cloud apps मध्ये login करून संबंधित फोल्डर्स delete करा.
Uninstall केलं म्हणजे मोबाईल पूर्णपणे स्वच्छ झाला असं समजू नका!"
संपूर्ण स्वच्छतेसाठी, अॅप uninstall केल्यानंतर उरलेला डेटा, cache आणि फोल्डर्सही काढा.
नाहीतर, 'डेटा नावाचे भाडेकरू' तुमच्या फोनमध्ये राहणारच – स्पेस घेऊन, फोन स्लो करत, आणि कधी धोका वाढवत.
0 टिप्पण्या