Ticker

6/recent/ticker-posts

फोन पे, गूगल पे वापरताय ? UPI च्या नियमा मध्ये सरकारचा मोटा बदल १ ऑगस्ट पासून लागू ! जाणून घ्या नियम

 जर तुम्ही रोजचं व्यवहार Google Pay, PhonePe, Paytm किंवा कोणत्याही UPI अ‍ॅपद्वारे करता असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी धक्कादायक पण उपयोगी ठरू शकते.



१ ऑगस्ट २०२५ पासून NPCI (National Payments Corporation of India) ने काही नवे UPI नियम लागू करत असून, ते तुमच्या रोजच्या डिजिटल व्यवहारांवर थेट परिणाम करणार आहेत. पण काळजी करू नका, या बदलांचा उद्देश UPI आणखी जलद, सुरक्षित आणि यशस्वी बनवण्याचा आहे.

म्हणजे काय? तर चला, जाणून घेऊया हे ७ मोठे बदल थोडक्यात आणि स्मार्ट भाषेत!

 1. दिवसात ५० वेळांपेक्षा जास्त बॅलन्स चेक नाही!

तुम्ही किती वेळा बॅलन्स बघता? १०? २०? आता UPI अ‍ॅप्समध्ये तुम्हाला एका दिवसात ५० वेळांपेक्षा जास्त बॅलन्स तपासता येणार नाही.

म्हणजे Google Pay आणि PhonePe अशा वेगवेगळ्या अ‍ॅप्समध्ये वेगवेगळ्या ५० मर्यादा लागू होतील.

का?

जास्तीचा बॅलन्स चेक म्हणजे NPCI सर्व्हरवर अनावश्यक ताण! म्हणूनच ही मर्यादा. स्मार्ट वापर करायचा आहे. 

 2. बँक अकाउंट माहिती पाहण्यातही लिमिट

आता UPI अ‍ॅपमध्ये तुम्ही दिवसात फक्त २५ वेळा तुमची लिंक केलेली बँक खाती पाहू शकता.

म्हणजे "माझं खातं लिंक झालं का?" हे ५५ वेळा बघण्याच्या सवयीवर ब्रेक लागणार!

3. AutoPay व्यवहार ठराविक वेळेतच होतील

तुमच्याकडे जर EMI, OTT सबस्क्रिप्शन किंवा ऑटोमॅटिक बिल पेमेंट्स UPI Autopay ने सेट असतील, तर हे व्यवहार आता फक्त नॉन-पिक अवर्समध्ये होणार.

 पीक अवर्स कोणते?

  • सकाळी 10:00 ते दुपारी 1:00 आणि
  • संध्याकाळी 5:00 ते रात्री 9:30

याचा अर्थ: Autopay व्यवहार हे व्यस्त वेळचक्र टाळून होणार, त्यामुळे व्यवहार फेल होण्याची शक्यता कमी होईल.

4. 12 महिने निष्क्रिय असलेलं UPI ID होणार बंद!

जर तुम्ही तुमचं UPI आयडी (उदा. yourname@paytm) १२ महिने वापरलं नाही, तर ते आपोआप बंद होईल.

उद्देश: Inactive आयडी मुळे सुरक्षिततेचा धोका निर्माण होतो. हे टाळण्यासाठी ही पॉलिसी.

 5. नवीन बँक खाते लिंक करताना जास्त व्हेरिफिकेशन

आता UPI अ‍ॅपमध्ये नवीन बँक खाती लिंक करताना अधिक तपासणी होईल.

ओटीपी, बायोमेट्रिक किंवा इतर वैध पद्धतीने खातं जोडावं लागेल.

फसवणूक कमी करण्यासाठी NPCI चं पाऊल.

6. Transaction Status वारंवार पाहता येणार नाही 

"Payment झाला का नाही?" हे दिवसात २० वेळा बघणाऱ्यांसाठी वाईट बातमी...

आता एका व्यवहाराचा Status फक्त ३ वेळाच तपासता येईल –
त्यातही प्रत्येक वेळेस ९० सेकंदाचं अंतर ठेवावं लागेल.

7. क्रेडिट लाईनद्वारे UPI व्यवहार (३१ ऑगस्टपासून)

नवा पर्याय लवकरच येत आहे. ३१ ऑगस्ट २०२५ पासून, जर बँक किंवा NBFC ने तुम्हाला पूर्व-मंजूर क्रेडिट (loan limit) दिला असेल, तर तो वापरून तुम्ही UPI व्यवहार करू शकता.

म्हणजे बँकेने तुम्हाला मंजूर केलेल्या loan limit मधून Google Pay/PhonePe वापरून क्रेडिट कार्डशिवायही EMI व्यवहार शक्य!

जिओवर बहिष्कार! महादेवी हत्तीण प्रकरणामुळे कोल्हापुरात उसळला संतापाचा स्फोट; हजारो ग्राहकांनी सिम पोर्टिंग सुरू केलं!

 या बदलांचा सामान्य वापरकर्त्यावर काय परिणाम होईल?

  • सामान्य वापरकर्त्यांसाठी फारसा त्रास अपेक्षित नाही.
  • Autopay व्यवहारांची वेळ थोडी बदलू शकते.
  • UPI फेल होण्याचं प्रमाण कमी होईल, म्हणजेच व्यवहार यशस्वी होण्याचा दर वाढेल.


१ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणारे UPI बदल तुमच्या सुरक्षेसाठी आणि व्यवहार अधिक यशस्वी व्हावेत म्हणून आहेत.
तुम्हाला काही विशेष सेटिंग बदलायची गरज नाही. फक्त रोजचे व्यवहार करत राहा, UPI अॅप आधीसारखं वापरत राहा!

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या