Ticker

6/recent/ticker-posts

KYC नाही, तर पैसे नाही! लाडकी बहिण योजनेचा नवा नियम जाहीर – तुमचं नाव राहणार का यादीत? वाचा सविस्तर

Ladaki Bahin Yojan KYC:१५०० रुपये महिन्याचे मिळणार का?” – हा प्रश्न सध्या राज्यातील लाखो महिलांच्या मनात धगधगतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘माझी लाडकी बहिण’ योजनेत मोठं अपडेट आलंय. आता प्रत्येक लाभार्थी बहिणीला ‘ई-केवायसी’ करणं बंधनकारक केलं आहे. आणि लक्षात ठेवा, KYC केली नाही तर स्कीम बंद!


नेमकं काय बदललं?

राज्य सरकारकडून लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दरमहा ₹1500 अनुदान दिलं जातं. पण आता, बोगस लाभार्थ्यांना हटवण्यासाठी ई-केवायसी सुरू करण्यात येणार आहे. म्हणजे ज्या बहिणींनी ही KYC पूर्ण केली नाही, त्यांना पुढच्या महिन्यापासून पैसा मिळणार नाही.

Ladaki Bahin Yojan KYC कशी करायची?

  1.  अधिकृत वेबसाइटला भेट द्या – ladkibahin.maharashtra.gov.in
  2.  मुख्यपृष्ठावर “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया” या लिंकवर क्लिक करा.
  3.  तुमचा Aadhaar Number आणि Mobile OTP टाकून प्रोसेस पूर्ण करा.
सध्या वेबसाईटवर KYC चा पर्याय live झालाय, पण प्रक्रिया थोड्याच दिवसांत सुरू होईल.

Ladaki Bahin Yojan KYC इतकं महत्त्वाचं का?

सरकारचं म्हणणं आहे की, “ज्या महिला खऱ्या पात्र आहेत, त्यांनाच लाभ मिळायला हवा.”KYC प्रक्रिया यासाठीच. यामुळे स्कीमचं trust आणि transparency वाढणार आहे.

कोणाला करावी लागणार KYC?

  • ज्यांनी लाडकी बहिण योजनेसाठी नोंदणी केली आहे
  • ज्यांना दर महिन्याला ₹1500 येतो
  • ज्यांना पुढेही स्कीमचा फायदा हवा आहे
लाखो बहिणी या योजनेवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत. मुलांचं शिक्षण असो, घरखर्च असो की दवाखान्याचे बिल – या १५०० रुपयांचा उपयोग हजार गोष्टींसाठी होतो.आता जर KYC नसेल केली, तर हा आधारच गमावण्याची वेळ येऊ शकते.
ही प्रक्रिया फारच साधी आहे, पण वेळेवर केली नाही, तर मोठं नुकसान होऊ शकतं.

KYC ची लिंक सुरू झाल्यावर लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करा.आणि हो, आपल्या सखी–मैत्रिणींना, बहिणींना, आईला ही बातमी शेअर करा.
KYC नाही केली, तर नाव यादीतून गायब... आणि बँक खातं रिकामं!"
तर जरा वेळ काढा, आणि आजच KYC करा!




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या