क्रिकेटच्या मैदानावर आपल्या वेगवान गोलंदाजीने आणि धडाकेबाज फलंदाजीने ओळख निर्माण करणारा अर्जुन तेंडुलकर आता आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करण्याच्या तयारीत असल्याची गोड बातमी समोर आली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजण्याचे संकेत मिळत आहेत.
रिपोर्ट्सनुसार, अर्जुनचा साखरपुडा मुंबईतील एका मोठ्या उद्योगपती घराण्याची लाडकी लेक, सानिया चंडोकसोबत गुपचूप पार पडला आहे.
'ती' कोण आहे? जिला अर्जुनने निवडले आपला जोडीदार
एकीकडे क्रिकेटची दुनिया, तर दुसरीकडे व्यवसायाचे साम्राज्य... पण अर्जुनची होणारी पत्नी सानियाची ओळख केवळ एवढीच नाही. अब्जाधीश आजोबा रवी घई (जे इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरीचे मालक आहेत) यांची नात असूनही, सानियाने स्वतःच्या पायावर उभे राहून वेगळी वाट निवडली आहे. लंडनमधून अर्थशास्त्रात पदवी घेतलेल्या सानियाला प्राण्यांबद्दल प्रचंड प्रेम आहे. याच प्रेमापोटी तिने मुंबईत पाळीव प्राण्यांसाठी एक हाय-टेक स्पा आणि स्टोअर सुरू केले आहे.
दोन दिग्गज घराण्यांचे नाते
हा केवळ दोन तरुणांचा नाही, तर दोन अत्यंत प्रतिष्ठित आणि मोठ्या कुटुंबांचा संगम आहे. एकीकडे क्रिकेट विश्वावर दशके राज्य करणारे 'तेंडुलकर' घराणे, तर दुसरीकडे मुंबईच्या उद्योग जगतात दबदबा असलेले 'घई' कुटुंब. हा खाजगी साखरपुडा सोहळा म्हणजे ग्लॅमर आणि प्रतिष्ठेचा एक अनोखा संगम होता, जो अत्यंत साधेपणाने पार पडला.
IPL 2026: संजू सॅमसन CSK मध्ये? पण राजस्थानने मागितले चेन्नईचे हे 3 खेळाडू, वाचा आतली गोष्ट!
अर्जुननेही आपल्या वडिलांच्या प्रचंड मोठ्या वारशाचे ओझे न बाळगता, गोवा संघाकडून खेळताना स्वतःला सिद्ध केले आहे. पदार्पणातच शतक ठोकून त्याने आपली क्षमता दाखवून दिली होती.
आता सर्वांच्या नजरा तेंडुलकर आणि घई कुटुंबाकडे लागल्या आहेत. ते या नात्याची अधिकृत घोषणा कधी करणार, याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
0 टिप्पण्या