Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce: एकेकाळी ज्यांच्या लव्हस्टोरीचे आणि डान्सचे व्हिडिओ पाहून चाहते 'कपल गोल्स' (Couple Goals) म्हणायचे, त्याच युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या नात्याचा असा शेवट होईल, याचा कोणी विचारही केला नव्हता. या वर्षी २० मार्च २०२५ रोजी दोघांनी कायदेशीररित्या विभक्त होत सर्वांना मोठा धक्का दिला. पण हा निर्णय का घेतला? यामागे नेमकं काय घडलं? यावर दोघांनीही मौन बाळगलं. आता, या हाय-प्रोफाइल घटस्फोटामागे केवळ राहण्याच्या जागेचा वाद नाही, तर एक वेगळंच 'तिसरं' कारण असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
चहलचा 'तो' टी-शर्ट म्हणजे शेवटचा इशारा होता?
घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच, चहलने घातलेल्या एका टी-शर्टने सोशल मीडियावर आग लावली होती. 'Be Your Own Sugar Daddy' (स्वतःचेच आधार बना) असा संदेश देणारा हा टी-शर्ट अनेकांना धनश्रीसाठी एक टोमणा वाटला. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चहलने यावरचा पडदा उचलला. तो म्हणाला, "तो काही ड्रामा नव्हता, तो एक थेट संदेश होता. जेव्हा गोष्टी हाताबाहेर जातात, तेव्हा शांत बसण्यापेक्षा स्पष्ट भूमिका घेणं महत्त्वाचं असतं. मला हेच सांगायचं होतं की, आता सगळं संपलंय." चहलच्या या बोलण्यावरून हे स्पष्ट होतं की, तो फक्त एक टी-शर्ट नव्हता, तर नातं संपल्याचा तो एक जाहीर इशारा होता.
विराट-रोहित २०२७ वर्ल्ड कप खेळणार की नाही ? BCCI ने घेतला मोठा निर्णय , गंभीरनेही दिले संकेत
वाद मुंबई-हरियाणाचा नाही, तर विचारांचा होता?
आतापर्यंत दोघांच्या घटस्फोटामागे मुंबईत राहण्याचा वाद हे मुख्य कारण असल्याचं म्हटलं जात होतं. धनश्रीला तिच्या करिअरसाठी मुंबईत राहायचं होतं, तर चहलला हरियाणात आपल्या आई-वडिलांसोबत. पण आता समोर आलेल्या माहितीनुसार, हा वाद फक्त जागेचा नव्हता, तर तो दोन वेगवेगळ्या जीवनशैली आणि विचारांचा होता.
एका बाजूला धनश्री, जी एक मॉडर्न आणि करिअर-ओरिएंटेड (Career-oriented) महिला आहे, जिच्यासाठी मुंबई तिची कर्मभूमी होती. तर दुसऱ्या बाजूला चहल, जो परंपरेशी आणि आपल्या कुटुंबाशी घट्ट जोडलेला आहे. त्याच्यासाठी आई-वडिलांची साथ हीच त्याची प्राथमिकता होती. सूत्रांच्या माहितीनुसार, याच दोन वेगवेगळ्या विचारसरणींमध्ये त्यांचं नातं अडकलं.
नात्यात 'करिअर' ठरलं व्हिलन?
थोडक्यात सांगायचं झाल्यास, त्यांच्या नात्यात 'तिसऱ्या' व्यक्तीची एन्ट्री झाली, पण ती व्यक्ती म्हणजे त्यांचं 'करिअर' आणि त्यांच्या 'प्राधान्यक्रम' (Priorities) होते. दोघांनीही आपापल्या जागी स्वतःला सिद्ध केलं होतं, पण जेव्हा एकत्र येऊन एका छताखाली राहण्याची आणि एकमेकांच्या विचारांना समजून घेण्याची वेळ आली, तेव्हा कुठेतरी ताळमेळ बसला नाही.
अर्थात, चहल किंवा धनश्रीने यावर अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही. पण त्यांच्या जवळच्या सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार, पैसा किंवा प्रॉपर्टी नाही, तर करिअर आणि कुटुंबाप्रती असलेल्या वेगवेगळ्या दृष्टिकोनामुळेच या सुंदर नात्याचा दुःखद शेवट झाला.
0 टिप्पण्या