आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर आता एका नव्या इनिंगसाठी सज्ज झाली आहे. अभिनयाच्या पलीकडे जात तिने आता बिझनेसच्या जगात पाऊल ठेवलं आहे. भूमीने तिची बहीण समीक्षा पेडणेकरसोबत मिळून 'बॅकबे' (Backbay) नावाचा एक प्रीमियम बेवरेज ब्रँड लॉन्च केला आहे, आणि या ब्रँडच्या पाण्याच्या किमतीमुळे सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अभिनयाच्या पलीकडे एक नवी ओळख
भूमी आणि तिची बहीण समीक्षा या दोघींनी मिळून तब्बल दोन वर्षं या ब्रँडवर मेहनत घेतली आहे. 'बॅकबे' हे फक्त एक नाव नाही, तर पेडणेकर भगिनींच्या स्वप्नांना आणि मेहनतीला मिळालेलं मूर्त स्वरूप आहे. त्यांनी फक्त ब्रँडच लॉन्च केला नाही, तर हिमाचल प्रदेशमध्ये स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग युनिटसुद्धा उभारली आहे. इथे हिमालयातून येणारं "नॅचरल मिनरल वॉटर" पॅक केलं जाणार आहे.
महिलांच्या हाती सूत्र, हिमाचलमध्ये मोठा प्लांट
या ब्रँडची सर्वात मोठी खासियत म्हणजे या कंपनीची संपूर्ण लीडरशिप महिलांच्या हाती आहे. भूमीने एका मुलाखतीत सांगितलं की, "आमच्या कंपनीत महिला शक्तीला प्राधान्य देण्यात आलं आहे." हिमाचलमधील या प्लांटची क्षमता दररोज ४५,००० बॉक्स बनवण्याची आहे, जे या प्रोजेक्टची भव्यता दर्शवते.
पण पाण्याची किंमत इतकी जास्त का?
आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे - एका पाण्याच्या बाटलीसाठी ₹150 किंवा ₹200 का? 'बॅकबे'च्या 500 मिलीलीटर पॅकची किंमत ₹150 आणि 750 मिलीलीटर पॅकची किंमत ₹200 आहे. यावर भूमीचं उत्तर अगदी स्पष्ट आहे.
ती म्हणते, "आम्ही 'हिमालयन प्रीमियम वॉटर' विकत आहोत. हे पाणी थेट हिमालयाच्या नैसर्गिक स्त्रोतामधून येतं, जिथे ते नैसर्गिक खनिजं आणि इलेक्ट्रोलाइट्सने परिपूर्ण असतं. हे पाणी मानवी हाताने स्पर्श न करता, थेट स्त्रोतावरच पॅक केलं जातं. त्यामुळे त्याची शुद्धता आणि गुणवत्ता सर्वोत्तम आहे."
प्लास्टिकला 'Bye-Bye', पॅकेजिंग आहे एकदम 'Unique'!
'बॅकबे'चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचं सस्टेनेबल पॅकेजिंग. बाजारात मिळणाऱ्या प्लास्टिक किंवा काचेच्या बाटल्यांपेक्षा हे पॅकेजिंग पूर्णपणे वेगळं आहे. कंपनीने 'गेबल टॉप पेपर पॅकेजिंग'चा वापर केला आहे, ज्यामुळे पर्यावरणाची काळजी घेतली जाते. विशेष म्हणजे, या पॅकेटची कॅप सुद्धा 'बायो कॅप' आहे, जी पर्यावरणासाठी सुरक्षित आहे. भारतात अशा प्रकारच्या इको-फ्रेंडली पॅकेजिंगचा वापर करणारी ही एकमेव कंपनी असल्याचा दावा केला जात आहे.
Star Pravah New Serial Nashibvaan:स्टार प्रवाहवर आलि आहे नवी मालिका नशीबवान ! अशी आहे मालिकेची कथा
फक्त पाणी नाही, भविष्यात मोठा धमाका!
'बॅकबे' फक्त एका पाण्याच्या ब्रँडपुरतं मर्यादित राहणार नाही. हा एक प्रीमियम बेवरेज ब्रँड असेल, ज्याचे अनेक नवनवीन प्रोडक्ट्स सध्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या टप्प्यात आहेत. लवकरच कंपनी तीन वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये (लिची, पीच आणि लाइम) स्पार्कलिंग वॉटरसुद्धा बाजारात आणणार आहे.
भूमीचा आत्मविश्वास मोठा आहे. तिने पुढच्या चार वर्षांत १०० कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याचं ध्येय ठेवलं आहे. ती म्हणते, "आमचं स्वप्न आहे की १५ वर्षांनंतर आम्ही प्रत्येक भारतीयाच्या घरात पोहोचलेलो असू."
आता हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल की, अभिनयाच्या पिचवर चौकार आणि षटकार मारणारी भूमी पेडणेकर बिझनेसच्या या नव्या मैदानात किती मोठी खेळी करते.
0 टिप्पण्या