Ticker

6/recent/ticker-posts

IPL 2026: तू चेन्नई सुपर किंग्स मध्ये ये, अश्विनची संजू सॅमसन थेट ट्रेडिंग ऑफर; Video तुफान व्हायरल!


आयपीएल 2026 च्या मेगा ऑक्शनपूर्वीच खेळाडूंच्या 'ट्रेडिंग'च्या चर्चांनी जोर धरला आहे. पण या गंभीर वातावरणात, टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने एक अशी विनोदी गुगली टाकली आहे, की सर्वजण हैराण झाले आहेत. त्याने थेट राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनलाच 'ट्रेड' करण्याची ऑफर दिली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

काय आहे व्हायरल व्हिडिओमधील किस्सा?

सध्या संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स मॅनेजमेंटवर नाराज असून तो संघ सोडू शकतो, अशा बातम्या येत आहेत. त्याचवेळी अश्विनही चेन्नई सोडणार असल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अश्विनने त्याच्या 'कुट्टी स्टोरीज विथ ऐश' या युट्यूब शोमध्ये संजू सॅमसनला बोलावले.

Sanju on #KuttiStoriesWithAsh, powered by @PeterEngland_. Drops tomorrow afternoon. pic.twitter.com/J2QQ5Ia5eZ

— Kutti Stories with Ash (@crikipidea) August 8, 2025

या शोच्या व्हायरल टीझरमध्ये अश्विन संजूला हसत-हसत म्हणतो, ""माझ्याकडे विचारायला खूप प्रश्न आहेत… पण आधी मी थेट ट्रेडिंग करून टाकतो. मी केरलमध्ये रहायला खुश आहे. अफवा खूप आहेत, मलाही काही ठाऊक नाही. म्हणून मी तुझ्याकडे आलोय. जर मी केरलमध्ये राहिलो तर तू चेन्नईला परतशील का?"

सॅमसन हा प्रश्न ऐकून हसू आवरू शकला नाही आणि चाहत्यांनीही हा क्लिप सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल केला.

अश्विन ने अस बोलून ज्या सोसियल मीडिया वर चर्चा सुरू आहेत की संजू सॅमसन राजस्थान टीम सोडणार आहे या चर्चा ना त्याच्या समोर आणला आणि संजू ने फक्त हसून काही न बोलता याचा उत्तर देणं टाळलं. संजू सॅमसन काहीच न बोलणं याचा अर्थ सॅमसन राजस्थान टीम सोडू पण शकतो आता येणारी वेळेस सांगेल की सॅमसन काय करणार .

आशिया कप 2025: भारत-पाकिस्तान तीन वेळा भिडणार? क्रिकेट चाहत्यांसाठी महामुकाबल्याचा ट्रिपल डोस!

पण अश्विनच्या या हजरजबाबीपणाने तणावपूर्ण वातावरणाला एक मजेशीर वळण दिले आहे. चाहते त्याच्या या 'कूल' अंदाजाचे कौतुक करत आहेत. आता ही मजा-मस्ती भविष्यात सत्यात उतरते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पण तोपर्यंत या व्हिडिओने चाहत्यांचे मात्र पुरेपूर मनोरंजन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या