मुंबई: 'सीता रामम' या चित्रपटामुळे देशभरात प्रसिद्धी मिळवलेली आणि महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या प्रोफेशनल लाईफइतकीच पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषसोबत तिचं नाव जोडलं जात असून, दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना पेव फुटलं आहे. या सर्व चर्चांवर मृणालने थेट उत्तर देणं टाळलं असलं तरी, तिने 'नजर लागण्याबद्दल' केलेलं एक विधान खूप काही सांगून जात आहे. तिच्या या बोलण्यामुळे या चर्चांना आणखीनच खतपाणी मिळालं आहे.
'तो' व्हायरल व्हिडिओ आणि चर्चांना उधाण!
या चर्चांची सुरुवात झाली ती एका पार्टीतील व्हिडिओमुळे. काही दिवसांपूर्वी मृणाल आणि धनुष एका पार्टीत एकत्र दिसले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये धनुष मृणालचा हात धरून तिच्याशी बोलताना दिसला. इतकंच नाही, तर मृणालच्या एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगलाही धनुषने खास हजेरी लावली होती. यानंतर दोघांच्यात 'फ्रेंडशिप' पेक्षा काहीतरी जास्त असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. दोघांच्या चाहत्यांमध्ये एकच प्रश्न विचारला जाऊ लागला - "खरंच त्यांच्यात काहीतरी शिजतंय का?
मृणाल अखेर बोलली, पण... 'नजर लागते'!
जेव्हा मृणालला तिच्या पर्सनल लाईफ आणि धनुषसोबतच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा तिने अत्यंत सूचक प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, "मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा आगामी प्रोजेक्ट्सबद्दल जास्त बोलणं टाळते. कारण मला नजर लागते. काही गोष्टी अशा असतात की त्या पूर्ण होण्याआधीच आपण बोलून टाकतो आणि स्वतःच त्या गोष्टींना नजर लावतो."
तिचं हे बोलणं म्हणजे नात्याची अप्रत्यक्ष कबुली आहे की फक्त एक सावध प्रतिक्रिया? यावरून आता वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. मृणालने तिच्या नात्याला कुणाची 'बुरी नजर' लागू नये म्हणूनच मौन बाळगलं आहे का, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
रक्षा बंधन 2025: कधी आहे राखी पौर्णिमा? जाणून घ्या योग्य तारीख आणि शुभ मुहूर्त
पर्सनल लाईफ 'प्रायव्हेट' ठेवण्यावर भर
मृणाल नेहमीच तिचं खासगी आयुष्य कॅमेऱ्यापासून दूर ठेवण्यास प्राधान्य देते. ती पुढे म्हणाली, "जगाला किती सांगायचं यावर आपलं नियंत्रण असायला हवं. माझं व्यक्तिमत्व खूप वेगळं आहे. मला माझ्या आयुष्यात काय चाललंय याबद्दल सतत बोलायला आवडत नाही." तिच्या या स्वभावामुळेच ती तिच्या आणि धनुषच्या नात्याबद्दल उघडपणे बोलत नसल्याचं स्पष्ट दिसतं.
धनुषच्या आयुष्यातही नव्या नात्याची सुरुवात?
दुसरीकडे, धनुषचा काही काळापूर्वीच पत्नी ऐश्वर्या रजनीकांतसोबत घटस्फोट झाला आहे. तब्बल १८ वर्षांच्या संसारानंतर ते वेगळे झाले. अशातच धनुषच्या आयुष्यात मृणालच्या रूपाने नव्या प्रेमाची एन्ट्री झाल्याने त्याच्या चाहत्यांसाठीही ही एक मोठी बातमी आहे.
सध्यातरी मृणाल आणि धनुष या दोघांनीही आपल्या नात्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेलं नाही. पण मृणालचं 'नजर लागण्याचं' विधान आणि दोघांचं एकत्र दिसणं, या सर्व गोष्टींमुळे त्यांच्यातील नात्याच्या चर्चा थांबण्याऐवजी आणखी वाढत आहेत. आता त्यांचे चाहते ते स्वतः या नात्याची गोड बातमी कधी देतात याचीच आतुरतेनेवाट पाहत आहेत.
0 टिप्पण्या