मुख्य मुद्दे:
- रक्षाबंधन झाल्यावर मनगटावरची राखी किती दिवस ठेवावी, याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो.
- राखी काढल्यानंतर तिचं काय करावं, जेणेकरून तिचा अपमान होणार नाही?
- या लेखात आपण धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेऊया.
रक्षाबंधन! भाऊ-बहिणीच्या नात्याचा गोडवा जपणारा सण. या दिवशी बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. तर भाऊ तिचं आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन देतो. हा सण संपतो, पण त्याचं प्रतीक असलेली राखी मनगटावर तशीच राहते. पण मग एक प्रश्न हमखास पडतो ही राखी किती दिवस बांधून ठेवायची? आणि काढल्यावर तिचं काय करायचं? चला तर मग जाणून घेऊया काय करायच राखीव आणि कधी काढायची हातातून.
राखी किती दिवस मनगटावर ठेवावी? शास्त्र काय सांगतं?
धार्मिक मान्यतेनुसार, राखी किती दिवस घालावी यासाठी कोणताही कडक नियम नाही. पण परंपरा आणि शास्त्रानुसार काही गोष्टी नक्कीच सांगितल्या आहेत:
- २४ तास बंधनकारक: राखी बांधल्यानंतर किमान २४ तास तरी ती मनगटावर असणं शुभ मानलं जातं.
- १५ दिवसांची परंपरा: अनेक ठिकाणी श्रावण पौर्णिमेपासून (रक्षाबंधन) ते भाद्रपद महिन्याच्या अमावस्येपर्यंत, म्हणजेच साधारण १५ दिवस राखी मनगटावर ठेवली जाते.
- अन्य सणांपर्यंत: काही लोक जन्माष्टमी किंवा गणेश चतुर्थीच्या दिवशी राखी उतरवतात.
- पितृपक्षापूर्वी काढावी: एक महत्त्वाची मान्यता अशी आहे की, पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी राखी काढून टाकावी. कारण पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.
थोडक्यात, तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार आणि परंपरेनुसार ३, ७, ११ किंवा १५ दिवसांपर्यंत राखी मनगटावर ठेवू शकता.
Science काय म्हणतं? जास्त काळ राखी घालणं धोकादायक आहे?
आता वळूया वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे. राखी ही सहसा सुती किंवा रेशमी धाग्यांपासून बनलेली असते. जेव्हा आपण अंघोळ करतो किंवा हात धुतो, तेव्हा ती ओली होते.
- बॅक्टेरियाचा धोका: ओल्या धाग्यामध्ये धूळ आणि घाण अडकून राहते. यामुळे तिथे बॅक्टेरिया (Bacteria) वाढू शकतात.
- त्वचेचे आजार: या बॅक्टेरियामुळे त्वचेवर खाज सुटणे, पुरळ येणे किंवा इन्फेक्शन (Skin Infection) आणि ऍलर्जी (Allergy) होण्याची शक्यता असते.
त्यामुळे, वैज्ञानिक दृष्ट्या, जोपर्यंत राखी स्वच्छ आणि सुस्थितीत आहे, तोपर्यंतच ती घालावी. ती मळकट किंवा खराब होऊ लागल्यास काढून टाकणंच आरोग्यासाठी चांगलं आहे.
फळांवर स्टिकर का असतात तुम्हाला माहित आहे का? 99% लोक करतात फळ खरेदी करताना ही मोठी चूक!
राखी काढल्यानंतर तिचं काय करायचं? चुकूनही 'ही' चूक करू नका!
राखी हा एक पवित्र धागा आहे, त्यामुळे तिला कचऱ्यात किंवा इतर कुठेही फेकून देणं हा त्यामागील भावनेचा अपमान मानला जातो. त्यामुळे राखी काढल्यानंतर तिची योग्य आणि सन्मानपूर्वक विल्हेवाट लावण्यासाठी हे मार्ग वापरा:
- जल प्रवाहित करा: राखीला एखाद्या नदीच्या किंवा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात सोडून द्या. हा विसर्जनाचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो.
- झाडाला बांधा: तुमच्या घरातील किंवा जवळच्या कोणत्याही झाडाच्या फांदीला तुम्ही ही राखी बांधू शकता. झाड हे जीवन आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं.
- झाडाच्या मुळाशी ठेवा: एखाद्या झाडाच्या किंवा तुमच्या घरातील कुंडीतील रोपट्याच्या मुळाशी मातीमध्ये ही राखी दाबून ठेवा.
- एका ठिकाणी जमा करा: तुम्ही वर्षभरातील सर्व राख्या एका स्वच्छ डबीत किंवा पिशवीत जमा करून ठेवू शकता आणि नंतर त्या सर्वांना एकत्र विसर्जित करू शकता.
लक्षात ठेवा, बहिणीने प्रेमाने बांधलेल्या त्या पवित्र धाग्याचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे या रक्षाबंधनाला राखीचा सन्मान बांधतानाही करा आणि ती उतरवतानाही!
0 टिप्पण्या