Ticker

6/recent/ticker-posts

जिओवर बहिष्कार! महादेवी हत्तीण प्रकरणामुळे कोल्हापुरात उसळला संतापाचा स्फोट; हजारो ग्राहकांनी सिम पोर्टिंग सुरू केलं!

कोल्हापूर – महादेवी हत्तीण प्रकरणाने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात तुफान जनआंदोलन उभं राहिलं आहे. नांदणी मठातील श्रद्धेची प्रतीक असलेल्या महादेवी हत्तीणीला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर गुजरातमधील ‘वनतारा’ प्रकल्पात हलविण्याचा निर्णय झाला. या राजकीय आणि धार्मिक घडामोडींनी स्थानिक नागरिक आणि युवांमध्ये तीव्र संताप निर्माण केला आहे, ज्याचा थेट परिणाम रिलायन्स जिओच्या ग्राहकसंख्येवर होताना दिसतो आहे.


सिम पोर्टिंगची लाट

या प्रकरणाशी रिलायन्स समूहाला जोडण्यात आल्यामुळे कोल्हापूरमधील नागरिकांनी जिओच्या सर्व्हिसला बहिष्कार घातला आहे. असंतुष्ट ग्राहक आणि युवकांनी मोठ्या प्रमाणावर जिओचे सिम पोर्ट करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी जिओवरचा विश्वास गमवल्याने अन्य टेलिकॉम कंपन्यांकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिरोळ तालुक्यासह हजारो लोकांचे सिम पोर्टिंगच्या विनंत्या करण्यात आल्या आहेत.

धर्मभावना दुखावल्यानं संताप

स्थानिक मंडळींना वाटतं, जिओचा अप्रत्यक्ष संबंध या संपूर्ण प्रकरणाशी आहे आणि त्यामुळे ते जाणीवपूर्वक निषेध करतायत. कोल्हापुरातील अनेक महिला, युवक आणि व्यावसायिकांनी आपल्या सिमकार्डचे पोर्टिंग सुरू केलंय. दुकानांमध्ये पोर्टिंगसाठी रांगा लागल्या आहेत, तर काही मोबाईल स्टोअर्सनी अतिरिक्त स्टाफ ठेवला आहे.

एका झटक्यात समजून घ्या सगळ्या घडामोडी

  • सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे महादेवी हत्तीणीला वनतारा, गुजरात येथे हलविले.
  • यास तीव्र विरोध होत असून रिलायन्स-जिओ विपरीत जनआंदोलन पेटतंय.
  • हजारोंनी पोर्टिंगसाठी विंनंती केलीय; इतर टेलिकॉम कंपन्यांना फायदा.

महादेवी हत्तीण प्रकरणाने रिलायन्स जिओसारख्या मोठ्या ब्रँडलाही हादरवून सोडलंय. ग्राहक आता केवळ रिचार्ज किंवा ऑफर्स पाहून निर्णय घेत नाहीत – ते भावना आणि मूल्यांवर ठाम उभे राहतात.

ही घटना भविष्यातील ब्रँड धोरणांसाठी एक धडा ठरेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या