Ticker

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ नागरिकांना चालु होणार ७ हजार महिना? कसे मिळेल ७ हजार मानधन? ज्येष्ठ नागरिक योजनेची संपूर्ण माहिती

महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून “ज्येष्ठ नागरिक सेवा आणि सुविधा विधेयक 2025” विधानसभेत मांडण्यात आले आहे. या विधेयकानुसार राज्यातील 65 वर्षे व अधिक वयाच्या पुरुष व महिलांना दरमहा ₹7,000 मानधन देण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय अनेक नवीन सुविधा व हक्क-based योजना देखील प्रस्तावित आहेत.


कोण पात्र?

विधेयकानुसार, ज्यांचे वय 65 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा सर्व महिला व पुरुषांना "ज्येष्ठ नागरिक" समजले जाणार असून ते या योजनांसाठी पात्र असतील.

या योजना काय असतील?

1. दरमहा ₹7,000 मानधन: आर्थिकदृष्ट्या दुर्बल ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून दरमहा ₹7,000 चे मासिक मानधन दिले जाईल.
2. ₹5 लाखांपर्यंत मोफत आरोग्यसेवा: शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयांमध्ये ₹5 लाखांपर्यंत मोफत उपचार देण्यात येतील.
3. महाराष्ट्र दर्शनासाठी ₹15,000 अनुदान: राज्यातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी प्रत्येक वर्षी ₹15,000 पर्यंत प्रवास अनुदान दिले जाईल.
4. निवारा आणि जेवणाची व्यवस्था: ज्येष्ठ नागरिकांचे वारस नसल्यास किंवा सांभाळ करणारे कोणी नसल्यास सरकार त्यांच्या राहण्याची व जेवणाची मोफत सोय करेल.
5. टोल फ्री हेल्पलाईन सेवा: समस्या व तक्रारीसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला जाईल.
6. सर्व सेवा कायदेशीर हक्क स्वरूपात:
या योजना कोणत्याही राजकीय बदलानंतर बंद होणार नाहीत, कारण या विधेयकात कायदेशीर तरतूद केली जाणार आहे.

विधेयकाचा उद्देश काय आहे?

महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे आणि त्यांची आर्थिक, वैद्यकीय व सामाजिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे.अनेक वृद्धांना कोणताही आधार नाही. त्यामुळे त्यांना राज्य सरकारकडून अधिक सहकार्य मिळावे, हा या विधेयकाचा मुख्य हेतू आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या विद्यमान योजनांची अंमलबजावणी अपुरी असल्याने, नवीन कायदेशीर योजनेची गरज भासत होती.

कधीपासून योजना लागू होईल?

हे विधेयक मंजूर झाल्यावर त्याचा सरकारी आदेश (जीआर) प्रसिद्ध केला जाईल.त्यानंतर अटी व शर्ती स्पष्ट होतील आणि प्रत्यक्ष लाभ दिला जाईल.योजना तात्काळ अंमलबजावणीस येण्याची शक्यता आहे.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी 65 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.योजनेचा खर्च राज्य सरकारच्या निधीतून केला जाणार आहे.अटी-शर्ती, अर्ज पद्धत, आणि लाभाचे तपशील सरकारी जीआरमध्ये स्पष्ट केले जातील.


"ज्येष्ठ नागरिक सेवा आणि सुविधा विधेयक 2025" हा महाराष्ट्रातील वृद्धांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. दरमहा ₹7,000 मानधन, आरोग्य सेवा, पर्यटन अनुदान, आणि निवारा सुविधा ही वृद्धांसाठी आर्थिक व मानसिक आधार ठरेल. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याचा अंमल वेगाने होण्याची शक्यता आहे.

आपल्या आजी-आजोबांना, वडीलधाऱ्यांना या योजनेची माहिती शेअर करा आणि लाभ मिळवून द्या!





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या