Ticker

6/recent/ticker-posts

E-Peek Pahani 2025 कशी करायची? ई पिक पाहणीसाठी तारीख, नियम, अ‍ॅप संपूर्ण माहिती इथे वाचा

शेतकरी मित्रांनो, सरकारने खरीप हंगामासाठी ई-पिक पाहणी सुरू केली आहे, आणि ही पाहणी वेळेत केली नाही, तर पीक विमा, अनुदान, पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत!म्हणूनच, आज आपण अगदी सोपी भाषेत आणि टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत की ई पीक पाहणी कशी करायची?



E-Peek Pahani कधी करायची?

  • 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2025 – ज्या शेतकऱ्यांना स्वतः पाहणी करता येते
  • 15 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर 2025सहाय्यक किंवा तलाठी यांच्याकडून जे करणार

पाहणीसाठी कोणतं अ‍ॅप लागेल?

शासनाने ई पीक पाहणीचे अ‍ॅप नव्या 4.0.0 वर्जनसह अपडेट केले आहे, जे मोबाइलवरून वापरणे अधिक सुलभ झाले आहे. तुमचं अ‍ॅप अपडेट असणं खूप महत्त्वाचं आहे.
  • E Peek Pahani 4.0.0 हे नवे अ‍ॅप वापरा
  • मोबाईलमध्ये लोकेशन आणि इंटरनेट चालू ठेवा
E-Peek Pahani 2025 कशी करायची?
  1. महसूल विभाग निवडा – जसे की अमरावती, नाशिक, पुणे, कोकण, नागपूर इ.
  2. "शेतकरी म्हणून लॉगिन" या ऑप्शनवर क्लिक करा
  3. मोबाईल नंबर टाकासांकेतिक क्रमांक (OTP) मिळवानोंदणी पूर्ण करा
  4. जिल्हा, तालुका, गाव निवडा
  5. खाते क्रमांक / गट क्रमांकाने शोधा
  6. तुमचं नाव, खाते माहिती दिसेल, खातेदार सिलेक्ट करा

ई-पिक पाहणी पीक माहिती कशी भरायची?

  1. पीक माहिती नोंदवा” या पर्यायावर क्लिक करा
  2. हंगाम निवडा – खरीप
  3. पीक निवडा – कापूस, सोयाबीन, मका इ.  एकच पीक असल्यास – “एक पीक” निवडा    दोन पिकं असल्यास – “मिश्र पीक” निवडा
  4. लागवडीची तारीख भरा
  5. शेतीचे क्षेत्रफळ (एकूण किती एकर/हेक्टर आहे) टाका
  6. जलसिंचनाचं साधन निवडा – विहीर, नाला, ड्रीप इ.
  7. शेवटी पिकाचा फोटो शेतातून काढा आणि सबमिट करा
  8. टीप: शेतात असतानाच GPS लोकेशन अचूक लागेल, घरून भरल्यास अ‍ॅप पुढे जाणार नाही!

पीक पाहणी यशस्वी झाली का हे कसं पाहावं?

  1. "पीक माहिती पहा" या ऑप्शनवर क्लिक करा.
  2. तुमच्या भरलेल्या पिकांची यादी दिसत असेल तर पाहणी यशस्वी आहे.
  3. दिसत नसेल तर चुका सुधारून पुन्हा एकदा नोंद करा.


महत्त्वाच्या सूचना
  • चुकीची माहिती दिल्यास शासन तुमचं अर्ज फेटाळू शकतं.
  • सातबाऱ्यावर सिंचन स्रोत चढवण्यासाठी जलसिंचन माहिती बरोबर भरा.
  • केवळ अ‍ॅप वापरून सगळं सहज करता येतं, परंतु मोबाईलमध्ये लोकेशन आणि इंटरनेट चालू ठेवा.

शेतकऱ्यांनो, ई पीक पाहणी हीच तुमचं हक्काचं शस्त्र आहे! तुमचा हक्काचा पैसा मिळवायचा असेल, तर आजच ही प्रक्रिया पूर्ण करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या