Ticker

6/recent/ticker-posts

नवीन Mahindra Bolero 2025: लाँच साठी तयार जाणून घ्या फीचर्स, इंजिन, किंमत आणि लॉन्च डिटेल्स

महिंद्राची बोलेरो आता नव्या रूपात येतेय! भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह SUV पैकी एक असलेल्या बोलेरोचा नवा अवतार 15 ऑगस्ट 2025 रोजी अनावरण होणार आहे. आता ही बोलेरो दिसायला अधिक स्टायलिश, टेक्नॉलॉजीने भरलेली, पण तरीही तिचं खडबडीत SUV लूक अबाधित राहणार आहे.


नवीन Mahindra Bolero 2025 काय खास असेल?

महिंद्रा नवीन बोलेरोसाठी New Flexible Architecture (NFA) प्लॅटफॉर्म वापरणार आहे, जो पेट्रोल, डिझेल, हायब्रिड आणि EV पॉवरट्रेनला सपोर्ट करतो. म्हणजे ही बोलेरो भविष्यात इलेक्ट्रिकमध्येही येऊ शकते!

 इंजिन आणि ट्रान्समिशन 

  • 1.5L डिझेल (75 ते 100hp ट्यूनिंगसह)
  • 1.5L टर्बो पेट्रोल (अपेक्षित)
  • 5-स्पीड/6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स
  • AMT किंवा टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक

नवीन Mahindra Bolero 2025 फीचर्स

बाहेरची डिझाईन 

  • नवीन महिंद्रा लोगो
  • एलईडी हेडलॅम्प्स + DRLs
  • उभा ग्रिल आणि स्क्वेअर व्हील आर्चेस
  • फ्लश डिझाईन डोअर हँडल्स
  • अलॉय व्हील्स
  • स्पेअर व्हील टेलगेटवरच

केबिनमधील डिझाइन 

  • Android Auto आणि Apple CarPlayसह टचस्क्रीन
  • डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
  • ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल
  • प्रीमियम सीट अपहोल्स्ट्री
  • पॅनोरॅमिक सनरूफ (सेगमेंट-फर्स्ट असू शकते!)

सेफ्टी फिचर्स 

  • Level 2 ADAS: अ‍ॅडॅप्टिव्ह क्रूझ, लेन असिस्ट इ.
  • 6 एअरबॅग्ज
  • ABS + EBD
  • इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल
  • पार्किंग सेन्सर्स + 360° कॅमेरा

नवीन Mahindra Bolero 2025 ची किंमत 

महिंद्राची नवीन बोलेरो ₹10 लाख ते ₹12.50 लाख (एक्स-शोरूम) या किमतीत लॉन्च होण्याची शक्यता आहे. ही किंमत तिच्या फिचर्सनुसार खूपच स्पर्धात्मक मानली जाऊ शकते.

बोलेरोचं थेट कोणाशी स्पर्धा नाही, पण ती Hyundai Creta, Kia Seltos, Maruti Grand Vitara यांसारख्या SUV गाड्यांना, आणि Maruti Ertiga, Renault Triber, Innova Crysta यांसारख्या MUV गाड्यांना ग्रामीण व अर्ध-शहरी भागात टक्कर देईल.

Mahindra Bolero 2025 कधी होणार लाँच

15 ऑगस्ट 2025: कॉन्सेप्ट व्हर्जनचे अनावरण

2025 अखेर – 2026 सुरुवात: शो-रूममध्ये डिलिव्हरी सुरू होण्याची शक्यता


जर तुम्ही एक मजबूत, फिचर-रिच आणि विश्वासार्ह SUV शोधत असाल – तर नवीन बोलेरो 2025 ही नक्कीच तुमच्या यादीत असली पाहिजे. शहरात चालवायला मस्त आणि गावाकडं रस्त्यावरील राजा – बोलेरोचा हाच USP कायम राहणार आहे



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या