Apple प्रेमींनो, तुमच्यासाठी एक मोठी आणि तितकीच Exciting बातमी आहे! ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, तो क्षण आता जवळ आला आहे. iPhone 16 बाजारात येऊन जेमतेम काही महिने झाले असले तरी, आतापासूनच iPhone 17 सीरीजची चर्चा टेक विश्वात सुरू झाली आहे. एका नव्या रिपोर्टनुसार, iPhone 17 च्या लाँच इव्हेंटची तारीख लीक झाली आहे, आणि ही तारीख जुन्या लीक्सशी मिळतीजुळती असल्याने या चर्चेला आणखी बळ मिळालं आहे.
या वर्षी Apple धमाका करण्याच्या तयारीत असून, तब्बल चार नवीन मॉडेल्स सादर करण्याची शक्यता आहे. मग तुमच्या मनातही प्रश्न आलाच असेल, की कधी होणार हा मेगा इव्हेंट? काय असतील नवीन फीचर्स? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, किंमत किती असणार? चला, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.
iPhone 17 लाँचची तारीख ?
एका प्रसिद्ध जर्मन पब्लिकेशनने स्थानिक मोबाईल ऑपरेटर्सच्या हवाल्याने दावा केला आहे की, Apple यावर्षी 9 सप्टेंबर रोजी आपल्या नेक्स्ट जनरेशन iPhone 17 सीरीजला जगासमोर सादर करेल. Apple दरवर्षी सप्टेंबर महिन्यातच आपले नवीन आयफोन लाँच करते, त्यामुळे ही तारीख अगदी खरी वाटत आहे.
जर हा रिपोर्ट खरा ठरला, तर या वेळापत्रकानुसार:
- प्री-ऑर्डर (Pre-order): 12 सप्टेंबर (शुक्रवार) पासून सुरू होऊ शकते.
- पहिली सेल (First Sale): 19 सप्टेंबरपासून भारतात आणि जगभरात विक्री आणि शिपमेंटला सुरुवात होऊ शकते.
ही माहिती Bloomberg चे प्रसिद्ध टेक रिपोर्टर मार्क गरमन (Mark Gurman) यांच्या अंदाजाशी मिळतीजुळती आहे, ज्यांनी आधीच सांगितले होते की Apple चा मोठा इव्हेंट 8 ते 12 सप्टेंबर दरम्यान होऊ शकतो.
नवीन फोन खरेदी करताय? फक्त काही दिवस थांबा! ऑगस्टमध्ये धुमाकूळ घालणार हे 4 जबरदस्त स्मार्टफोन्स
यावेळी 4 मॉडेल्स, मिळणार नवीन पॉवरफुल चिप!
यावर्षी Apple आपल्या ग्राहकांना अधिक पर्याय देण्याच्या तयारीत आहे. रिपोर्टनुसार, कंपनी एकूण चार मॉडेल्स लाँच करू शकते:
- iPhone 17
- iPhone 17 Air
- iPhone 17 Pro
- iPhone 17 Pro Max
सर्वात मोठी अपडेट चिपसेटमध्ये पाहायला मिळू शकते. iPhone 17 आणि iPhone 17 Air मध्ये A19 चिप दिली जाऊ शकते, तर Pro मॉडेल्सना (iPhone 17 Pro आणि Pro Max) अजून शक्तिशाली A19 Pro चिपसेटची ताकद मिळेल. म्हणजेच, प्रो मॉडेल्समध्ये स्पीड आणि परफॉर्मन्सचा एक नवीन स्तर अनुभवता येणार आहे.
डिझाइन आणि डिस्प्लेमध्ये काय असेल खास?
- डिस्प्ले: iPhone 17 आणि Pro मॉडेलमध्ये 6.3-इंच, iPhone 17 Air मध्ये 6.5-इंच, तर सर्वात मोठ्या iPhone 17 Pro Max मध्ये 6.9-इंचाचा डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे.
- बिल्ड क्वालिटी: iPhone 17, 17 Air आणि 17 Pro मध्ये ॲल्युमिनियम फ्रेम असू शकते, तर टॉप मॉडेल असलेल्या iPhone 17 Pro Max मध्ये पुन्हा एकदा प्रीमियम टायटॅनियम फ्रेम पाहायला मिळेल, जे त्याला अधिक मजबूत आणि आकर्षक बनवेल.
किती असेल Iphone 17 ची किंमत ?
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न - किंमत! रिपोर्टनुसार, iPhone 17 चे स्टँडर्ड मॉडेल वगळता इतर सर्व मॉडेल्सच्या किमतीत वाढ होऊ शकते. ही वाढ अंदाजे $50 (सुमारे 4,000 रुपये) असू शकते. त्यामुळे नवीन आयफोन घेण्यासाठी तुम्हाला थोडे जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.
या इव्हेंटमध्ये फक्त आयफोनच नाही, तर Apple Watch चे नवीन मॉडेल्स आणि तिसऱ्या जनरेशनचे AirPods Pro देखील लाँच होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हा सप्टेंबर महिना Apple प्रेमींसाठी खूपच खास आणि उत्कंठावर्धक ठरणार आहे, यात शंका नाही!
0 टिप्पण्या