"भांडे मिळत नाही, अपॉईंटमेंट होत नाही, काय करावं?"
अशा प्रश्नांनी सध्या बांधकाम कामगार त्रस्त झाले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून भांडे व गृह उपयोगी वस्तूंच्या संचासाठी ऑनलाइन तारीख मिळत नसल्याने हजारो बांधकाम कामगार निराश झाले आहेत. पण काळजी करू नका! योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं आणि अडचणीवर उपाय काय आहे, याची सविस्तर माहिती आपण खाली पाहणार आहोत.
काय आहे ही योजना?
राज्य सरकारकडून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 30 भांड्यांचा संच व एक उपयोगी पेटी मोफत दिली जाते. यामध्ये स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या सर्व आवश्यक वस्तू असतात.
संचामध्ये नवीन वस्तू देखील समाविष्ट केल्या जात आहेत, ज्यामुळे कामगार कुटुंबांना मोठा फायदा होतो. मात्र, सध्या अनेकजण अपॉईंटमेंट मिळत नसल्यामुळे या सुविधांपासून वंचित आहेत.
बांधकाम कामगार योजना भांडे मिळण का बंद झाल ?
- अनेक जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन अपॉईंटमेंट स्लॉट फुल आहेत.
- काही ठिकाणी बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी झाल्यामुळे तपासणीसाठी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.
- दलालांमार्फत नोंदणी करून घेतलेल्या फसवणूकप्रकरणांमुळे सर्व्हर आणि सिस्टमवर ताण आहे.
बांधकाम कामगार योजना भांडे मिळवण्यासाठी काय करावे?
ऑनलाईन तारीख न मिळाल्यास, खालील प्रमाणे पुढील पावले उचला:
1. संबंधित बांधकाम कामगार कार्यालयात थेट संपर्क साधा.
तिथे आपल्या नोंदणीचा तपशील देऊन समस्या सांगा.
2. ऑनलाईन तक्रार नोंदवा किंवा हेल्पलाईनवर कॉल करा:
लाच मागणीविरुद्ध तक्रार:
10464 किंवा 022-24212177
WhatsApp: 9930999977
Email: info@mahabocw.in
सामान्य माहिती व सहाय्यासाठी:
022-26572631, 022-26572632
WhatsApp: 7498122260
3. जिल्हास्तरीय कार्यालयामध्ये जाऊन अर्ज सादर करा.
आपली नोंदणी योग्य असल्यास अंतिम तारखेशिवायही संच दिला जाऊ शकतो.
हे लक्षात ठेवा
योजनेचे लाभ विनामूल्य आहेत. कोणाकडूनही पैसे देऊ नका.
फसवणूक करणाऱ्या दलालांपासून सावध राहा.तुमची नोंदणी वैध आहे का? हे ऑफिसमध्ये तपासून घ्या.
जर तुम्हाला अपॉईंटमेंट मिळत नसेल, तरीही निराश होऊ नका. योग्य मार्गाने प्रयत्न केल्यास भांडे संच आणि पेटी सहज मिळू शकते. सरकारने योजनेची पारदर्शकता राखण्यासाठी मदतीसाठी अनेक पर्याय खुले केले आहेत. त्यामुळे आपल्या हक्काचा लाभ नक्की मिळवा!
या माहितीची लिंक तुमच्या इतर बांधकाम कामगार मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांनाही योग्य मार्गदर्शन मिळवून द्या.
"हक्काचं भांडं... लाच देऊन नाही, नोंदणी करून मिळवा!"
0 टिप्पण्या