मुंबई: ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपलीय आणि RTO ऑफिसच्या चकरा मारण्याच्या नुसत्या कल्पनेनेच तुम्हाला घाम फुटतोय का? लांबच लांब रांगा, एजंट लोकांची डोकेदुखी आणि कागदपत्रांची जुळवाजुळव... हे सगळं आता विसरा! कारण आता तुम्ही घरबसल्या, अगदी सोफ्यावर बसून, तुमचा ड्रायव्हING लायसन्स रिन्यू करू शकता.
केंद्र सरकारच्या परिवहन मंत्रालयाने सुरू केलेल्या 'फेसलेस सर्व्हिस' (Faceless Service) मुळे आता लायसन्स रिन्यूअलची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि सोपी झाली आहे. चला, जाणून घेऊया याची संपूर्ण A to Z प्रोसेस.
ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन रिन्यू कस करायचं?
आता तुम्हाला RTO ऑफिसमध्ये जाण्याची अजिबात गरज नाही. फक्त खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा आणि तुमचं काम घरबसल्या होऊन जाईल.
- 'सारथी' पोर्टलला भेट द्या: सर्वात आधी सरकारच्या अधिकृत https://sarathi.parivahan.gov.in/ या वेबसाइटवर जा.
- आपलं राज्य निवडा: वेबसाइटवर तुमच्या राज्याचा पर्याय निवडा.
- 'Services on Driving Licence' वर क्लिक करा: आता तुमचा DL नंबर आणि जन्मतारीख टाकून तुमची माहिती मिळवा.
- फेसलेस रिन्यूअल'चा पर्याय निवडा: तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, त्यापैकी "Faceless Renewal of Driving Licence" हा पर्याय निवडा.
- आधार e-KYC व्हेरिफिकेशन: तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो टाकून तुमची ओळख वेरिफाय करा.
- डॉक्युमेंट्स ऑनलाइन अपलोड करा: तुमचा जुना DL, फॉर्म 1 (Physical Fitness Declaration) आणि आवश्यक असल्यास फॉर्म 1A (वय ४० पेक्षा जास्त असल्यास) यांची स्कॅन कॉपी अपलोड करा.
- ऑनलाइन फी भरा: राज्यानुसार साधारणपणे ₹200 ते ₹500 पर्यंतची फी ऑनलाइन भरा.
- अर्ज सबमिट करा: एकदा अर्ज सबमिट झाला की RTO अधिकारी तुमच्या कागदपत्रांची ऑनलाइन तपासणी करतील.
या फेसलेस सेवेचा फायदा कोण घेऊ शकतं?
- ज्यांच्या आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्सवरील माहिती (नाव, पत्ता) सारखी आहे.
- ज्यांचे लायसन्स एक्सपायर होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ झालेला नाही किंवा एक्सपायर होण्यास एक वर्ष बाकी आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांची हार्ड कॉपी घेऊन RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. सगळं काही ऑनलाइन होणार आहे.
भारतात दररोज किती पेट्रोल ,डिझेल लागते ? थक्क करणारी आकडेवारी समोर!
ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन रिन्यू करण्यासाठी कोणती कागदपत्रं लागणार?
- तुमचा जुना ड्रायव्हिंग लायसन्स
- फॉर्म 1 (शारीरिक तंदुरुस्तीचा अर्ज)
- फॉर्म 1A (जर वय 40 पेक्षा जास्त असेल किंवा कमर्शियल लायसन्स असेल तर डॉक्टरांकडून प्रमाणित)
- आधार कार्ड नंबर आणि OTP
- पासपोर्ट साईज फोटो (डिजिटल कॉपी)
तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची ऑनलाइन तपासणी यशस्वी झाल्यावर, नवीन ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्या घरच्या पत्त्यावर पोस्टाने पाठवलं जाईल. इतकंच नाही, तर ते तुमच्या DigiLocker मध्ये सुद्धा लगेच उपलब्ध होईल! तुम्हाला तुमच्या अर्जाचं स्टेटस SMS किंवा ईमेलद्वारे सतत मिळत राहील.
तर मग, आता RTO च्या फेऱ्या मारण्यात वेळ का घालवायचा? आजच या 'फेसलेस' सेवेचा फायदा घ्या आणि बना स्मार्ट नागरिक!
0 टिप्पण्या