Pik Vima Update: केंद्रीय कृषीमंत्र्यांनी कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत, पण तुमच्या खात्यात अजून पैसे आले नाहीत का? काळजी करू नका, सरकारकडून एक मोठी अपडेट आली आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही, त्यांना तो का मिळाला नाही आणि आता पुढे काय करायचे? याबद्दलची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया.
अखेर ज्या क्षणाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आला आहे. केंद्र सरकारने खरीप हंगाम 2024 आणि रब्बी हंगाम 2024-25 साठी पीक विम्याचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी राजस्थानमधून या योजनेचा शुभारंभ केला. पण, अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे - सगळ्यांना पैसे का मिळाले नाहीत? आणि ज्यांना मिळाले नाहीत, त्यांना कधी मिळणार?
महाराष्ट्रातील 'या' शेतकऱ्यांच्या खात्यात 921 कोटी रुपये जमा!
सर्वात आधी आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील जे शेतकरी पीक विमा योजनेसाठी पात्र ठरले होते, त्यांच्यासाठी सरकारने खजिना उघडला आहे. राज्यातील तब्बल 16 लाख 22 हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 921 कोटी 39 लाख रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. ही रक्कम खरीप 2024 आणि रब्बी 2024-25 या दोन्ही हंगामांसाठी आहे.पण थांबा, हे पैसे नेमके कोणाला मिळाले आहेत? इथेच खरा 'गेम' आहे.
तुम्ही ही एक 'चूक' तर केली नाही ना?
सरकारने स्पष्ट केले आहे की, पीक विम्याची रक्कम फक्त त्या शेतकऱ्यांना मिळाली आहे, ज्यांनी पिकांचे नुकसान झाल्यानंतर रीतसर तक्रार नोंदवली होती. तुम्ही खालीलपैकी एक गोष्ट केली असेल तरच तुम्ही पहिल्या टप्प्यात पात्र ठरला आहात:
- टोल-फ्री नंबरवर तक्रार: पीक विमा पावतीवरील टोल-फ्री नंबर 14447 यावर कॉल करून तक्रार करा आणि पीक विम्याचे स्टेटस विचारा
- ॲपद्वारे तक्रार: संबंधित विमा कंपनीच्या ॲपवरून फोटो काढून नुकसानीचा दावा (Claim) दाखल केला असेल.
ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली, त्यांच्या शेतात विमा कंपनीचे प्रतिनिधी येऊन पाहणी (Survey) करून गेले. त्यांनी नुकसानीचे फोटो काढले आणि नुकसानीची खात्री केली. अशाच शेतकऱ्यांच्या खात्यात सध्या पैसे जमा झाले आहेत.
तक्रार करूनही पैसे आले नाहीत? कधी येतील पैसे
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. "मी तर तक्रार केली होती, पंचनामा पण झाला, तरी पैसे का आले नाहीत?" असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर अजिबात काळजी करू नका.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पैसे वाटपाची ही केवळ सुरुवात आहे. हा पहिला टप्पा होता. ज्या पात्र शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत नव्हती, त्यांना पुढील ८ दिवसांच्या आत पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. निधी वितरणाची प्रक्रिया अजूनही सुरू आहे आणि लवकरच दुसऱ्या टप्प्यातील रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे, तुम्ही रीतसर तक्रार केली असेल, तर तुमचे पैसे 100% मिळणार, हे नक्की!
बाळ रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही! आता पुढे काय करायचं?
ही सरकारी योजना आहे, त्यामुळे काही नियम पाळणे बंधनकारक आहे. "बाळ रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही," हाच नियम इथेही लागू होतो. केवळ पीक विमा भरून शांत बसू नका. भविष्यात पिकांचे नुकसान झाल्यास, खालील गोष्टी लक्षात ठेवा:
- तात्काळ तक्रार नोंदवा: नुकसान झाल्याच्या 72 तासांच्या आत तक्रार नोंदवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- ई-पीक पाहणी (e-Pik Pahani) पूर्ण करा: सध्या ई-पीक पाहणी सुरू आहे. ज्यांनी ती पूर्ण केली नसेल, त्यांनी लवकरात लवकर करून घ्या. याशिवाय तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.
- पुरावा म्हणून फोटो काढा: ॲपद्वारे तक्रार करताना नुकसानीचे स्पष्ट फोटो काढून अपलोड करा.
जोपर्यंत तुम्ही तुमच्या नुकसानीबद्दल सरकार आणि विमा कंपनीला कळवणार नाही, तोपर्यंत तुम्हाला मदत मिळणार नाही.
तुमचं स्टेटस ऑनलाईन कसं तपासाल?
तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत किंवा तुमच्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे, हे तुम्ही घरबसल्या तपासू शकता. यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या (PMFBY) अधिकृत पोर्टलला भेट देऊन तुम्ही तुमचे स्टेटस पाहू शकता.
थोडक्यात, ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी घाबरून जाऊ नये. जर तुम्ही योग्य प्रक्रिया पूर्ण केली असेल तर पैसे लवकरच तुमच्या खात्यात जमा होतील. आणि भविष्यात नुकसान झाल्यास तक्रार करण्यास विसरू नका.
0 टिप्पण्या