भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. 9 ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधन साजरे होत असताना, जनाईने सिराजला राखी बांधतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला, ज्याने त्यांच्यातील नात्याचे सत्य सर्वांसमोर आणले आहे.
काही काळापूर्वी जनाईच्या वाढदिवसाच्या पार्टीतील एका फोटोमुळे सिराज आणि तिच्यात डेटिंगच्या अफवांना पेव फुटले होते. सोशल मीडियावर या दोघांच्या नात्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, रक्षाबंधनाच्या निमित्ताने या सर्व चर्चांना दोघांनीही एकाच फोटोने उत्तर दिले आहे. जनाईने सिराजला राखी बांधून त्याला आपला भाऊ मानत असल्याचे स्पष्ट केले आहे, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमधील संभ्रम दूर झाला आहे.
कोण आहे जनाई भोसले?
जनाई ही केवळ आशा भोसले यांची नात नसून, ती स्वतः एक गायिका, गीतकार आणि संगीतकार आहे. आपल्या आजीच्या पावलावर पाऊल ठेवत तिने संगीत क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. इतकेच नाही, तर जनाई लवकरच 'द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' या भव्य चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी, राणी सईबाई भोसले यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.
या एका फोटोने सिराज आणि जनाईने त्यांच्यातील पवित्र नात्याची कबुली देत सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.
0 टिप्पण्या