भारतीय क्रिकेटमध्ये सध्या हाय-व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. आशिया कपसाठी (Asia Cup 2025) टीम इंडियाची घोषणा झाली, पण जल्लोषाऐवजी वादाची ठिणगी पडली आहे. कारण? ज्या खेळाडूने नुकतीच भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली, ज्याने IPL मध्ये आपल्या टीमला चॅम्पियन बनवलं, तोच 'किंग' अर्थात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), टीममधूनच गायब आहे!
हे शॉकिंग सिलेक्शन पाहून भारताचा सर्वात हुशार क्रिकेटर मानला जाणारा आर. अश्विन (R Ashwin) गप्प बसला नाही. त्याने थेट निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) आणि BCCI च्या धोरणांवरच बॅट उचलली आहे, ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
अश्विनचा आगरकर यांना थेट सवाल!
आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना अश्विनने कोणताही आडपडदा न ठेवता आपला संताप व्यक्त केला. जणू काही तो निवड समितीलाच सुनावत होता.
"अन्याय होतोय... हे सरळ सरळ दिसत आहे," अश्विन म्हणाला. "एखाद्या खेळाडूची लायकी काय असते? श्रेयसने तुम्हाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली... तो मॅचविनर आहे. जर तुम्ही म्हणता की शुभमन गिल फॉर्मात आहे, तर श्रेयसने काय पाप केलंय? KKR ला चॅम्पियन बनवलं, 600 पेक्षा जास्त रन्स केले, आपल्या शॉर्ट बॉलची कमजोरी दूर केली... तरीही तो बाहेर? याचं उत्तर कोण देणार? What has Shreyas done wrong?"
अश्विनचा हा आक्रमक पवित्रा पाहून अनेकांनी त्याच्या धाडसाचे कौतुक केले आहे. त्याने थेट सिस्टीमवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
सिलेक्शन कमिटी खरंच हे विसरली? पाहा श्रेयसचा 'Report Card'
अजित आगरकर यांच्या निवड समितीने श्रेयस अय्यरला का वगळले, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. कारण त्याची अलीकडची कामगिरी पाहिली तर त्याला संघातून वगळण्याचं कोणतंच कारण दिसत नाही.
- IPL 2024 Champion: KKR ला 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या कॅप्टन्सीखाली ट्रॉफी जिंकून दिली.
- 600+ Runs Hero: IPL च्या एकाच सीजनमध्ये 600 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडला.
- Champions Trophy Winner: भारताला चॅम्पियन बनवण्यात मधल्या फळीत सिंहाचा वाटा उचलला.
- Domestic King: मुंबईला आपल्या नेतृत्वात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून दिली.
काय म्हणाले आगरकर ....
जेव्हा पत्रकारांनी अजित आगरकर यांना या वादग्रस्त निवडीबद्दल घेरलं, तेव्हा त्यांनी एक 'सेफ' आणि डिप्लोमॅटिक उत्तर दिलं.
ते म्हणाले, "तो (श्रेयस) अप्रतिम खेळतोय, यात कोणतीही शंका नाही. पण आम्ही त्याला कोणाच्या जागी घेणार? सध्या संघात फक्त 15 जणांचीच जागा आहे. त्याला त्याच्या संधीची वाट पाहावी लागेल."
आगरकरांनी जरी 'जागा नाही' असं कारण दिलं असलं, तरी राखीव खेळाडूंच्या यादीतही अय्यरचं नाव नसणं चाहत्यांना आणि तज्ज्ञांना खटकत आहे. सोशल मीडियावर #JusticeForShreyas ट्रेंड करत असून, चाहते BCCI ला प्रश्न विचारत आहेत.
तर मग 'सीन' काय आहे? जागा नाही की राजकारण?
एका बाजूला श्रेयस अय्यरची दमदार कामगिरी आणि दुसऱ्या बाजूला निवड समितीचा धक्कादायक निर्णय, यामुळे आता एकच प्रश्न विचारला जातोय - टीम इंडियामध्ये (Team India) जागा मिळवण्यासाठी फक्त Performance पुरेसा नाही का?
एखाद्या खेळाडूने देशासाठी आणि आपल्या टीमसाठी सर्वस्व पणाला लावल्यानंतरही जर त्याला 'जागा नाही' असं उत्तर मिळत असेल, तर यामागे दुसरं काहीतरी शिजतंय का? या Cricket News ने भारतीय क्रिकेटमधील स्पर्धेसोबतच अंतर्गत राजकारणाकडेही बोट दाखवले आहे. आता येणारा काळच ठरवेल की श्रेयस अय्यरला न्याय मिळतो की नाही.
0 टिप्पण्या