Ticker

6/recent/ticker-posts

बांदेकरांच्या घरात वाजणार सनई-चौघडे! या प्रसिद्ध अभिनेत्रीला सून बनवणार आदेश-सुचित्रा



मराठी मनोरंजन विश्वातून एक मोठी आणि तितकीच गोड बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे एका मोठ्या लग्नाची... एका अशा लग्नाची, ज्यामुळे दोन मोठी कुटुंबं आणि हजारो-लाखो चाहते एकत्र येणार आहेत. 'स्टार प्रवाह' वरील लोकप्रिय मालिका 'येड लागलं प्रेमाचं' मधील लाडकी 'मंजिरी' म्हणजेच अभिनेत्री पूजा बिरारी (Pooja Birari) आता लवकरच 'मिसेस बांदेकर' होणार आहे!

हो, तुम्ही बरोबर वाचलंत. पूजाचा हात कोणी धरलाय माहित आहे? महाराष्ट्राचे लाडके 'भावोजी' अर्थात आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा लेक, सोहम बांदेकर (Soaham Bandekar) याच्यासोबत पूजा विवाहबंधनात अडकणार आहे. या Wedding Announcement नंतर सोशल मीडियावर जणू अभिनंदनाचा पाऊसच पडत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अखेर 'मंजिरी'ला मिळाला तिचा रियल-लाईफ हिरो!



पूजा बिरारी (Pooja Birari Actress) ने तिच्या अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. 'येड लागलं प्रेमाचं' (Yed Lagal Premach) या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. पडद्यावर जरी तिची लव्हस्टोरी प्रेक्षकांना आवडत असली, तरी तिच्या खऱ्या आयुष्यातला राजकुमार कोण असेल, याची उत्सुकता सर्वांनाच होती. आता त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. पूजाला तिच्या आयुष्याचा जोडीदार सोहमच्या रूपात मिळाला आहे, आणि ही जोडी आतापासूनच चाहत्यांना #CoupleGoals देत आहे.

कलाकारांच्या घरात, कलाकाराचीच सून!

सोहम बांदेकर हा केवळ आदेश-सुचित्रा बांदेकरांचा मुलगा नाही, तर तो स्वतः एक अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. कलाकारांच्या घरात वाढलेल्या सोहमला कलेची उत्तम जाण आहे. आता त्याच्या आयुष्यात पूजाच्या येण्याने बांदेकरांच्या घरात आणखी एका गुणी कलाकाराची भर पडणार आहे. एका कलासक्त कुटुंबाला पूजाच्या रूपाने एक परफेक्ट सून मिळत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

Dashavatar Trailer Review: कांतारा सारखीच दैवी शक्ती, पण कॉपी नाही! दशावतार मराठी सिनेमाचा चेहरामोहरा बदलणार?

अरेंज मॅरेज की सीक्रेट Love Story?

ही बातमी समोर आल्यापासून एकच प्रश्न सर्वांच्या मनात आहे - पूजा आणि सोहमची ओळख झाली तरी कशी? ही एक Arranged Marriage आहे की पडद्यामागे काही दिवसांपासून शिजत असलेली एक सीक्रेट Love Story? या दोघांना एकत्र कोणी आणलं? त्यांची पहिली भेट कुठे झाली? सध्या तरी ही सर्व माहिती गुलदस्त्यात आहे. मात्र, राजश्री मराठीने ही बातमी शेअर करताच, या दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या