Ticker

6/recent/ticker-posts

PM मोदींच्या चीन दौऱ्यावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल: मित्र कोण आणि शत्रू कोण, हे आधी ठरवा



पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यावरून शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. "सर्वात आधी सरकारने हे स्पष्ट करावे की देशाचा मित्र कोण आहे आणि शत्रू कोण? सध्या तर कोणी मित्र दिसत नाही," अशा शब्दांत ठाकरे यांनी पंतप्रधानांना सवाल केला आहे.

SCO परिषदेसाठी चीन दौरा

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान चीनच्या तियानजिन शहरात होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. २०२० मध्ये झालेल्या गलवान संघर्षणानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. मोदींचा हा दौरा संबंध सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

"चीन आणि पाकिस्तान दोस्त की दुश्मन?" - उद्धव ठाकरेंचा सवाल

उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. ते म्हणाले, "गेली १० वर्षे पंतप्रधान जगभर फिरले. अशी कोणतीही जागा नाही जिथे ते गेले नाहीत. पाकिस्तानसोबत आपला संघर्ष सुरू आहे आणि त्याला चीन मदत करत आहे, हे आता उघड झाले आहे. मग चीन आणि पाकिस्तान आपले मित्र आहेत की शत्रू?"

ठाकरे यांनी "बॉयकॉट चायना" मोहिमेची आठवण करून देत विचारले, "जर चीन शत्रू आहे, तर पंतप्रधान तिथे का जात आहेत? आणि जर पाकिस्तान आपला शत्रू आहे, तर आपण त्यांच्यासोबत क्रिकेट का खेळत आहोत?

#WATCH | Delhi: On PM Modi's upcoming visit to China, Shiv Sena UBT chief Uddhav Thackeray says, "First of all, he should clarify who our enemies are, and who our friends are. PM Modi has been touring every inch of the world for the last 10 years... It has come out openly that… pic.twitter.com/Mcc2dVr5TC

— ANI (@ANI) August 7, 2025

"यांचे मुखवटे आता उतरत आहेत"

ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधताना म्हटले, "पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळून तुम्ही सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना काय उत्तर देणार? यांचे हिंदुत्वासह सर्व मुखवटे आता दिवसेंदिवस उतरत आहेत."

तुमच्या पगारापेक्षा जास्त दिवसाला कमवतात हे भारतातील 5 करोडपती भिकारी!

"देशाला एका मजबूत पंतप्रधानाची गरज"

उद्धव ठाकरे यांनी मणिपूरच्या परिस्थितीवरूनही सरकारवर टीका केली. ते म्हणाले , "आज देशाला एका खऱ्या पंतप्रधानाची आणि गृहमंत्र्याची गरज आहे. मणिपूर आजही जळत आहे, पण तिकडे कोणी लक्ष देत नाही. हे फक्त पक्ष आणि कुटुंब तोडण्यात व्यस्त आहेत. देशाला आज मजबूत सरकार, कणखर पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री हवे आहेत. जेव्हा देशावर संकट येते, तेव्हा हे लोक गायब होतात."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या