रस्त्याच्या कडेला किंवा मंदिराजवळ बसलेल्या भिकाऱ्याला पाहून तुमच्या मनात कधीतरी दया येते आणि तुम्ही काही रुपये दान करता. पण, काय होईल जर तुम्हाला कळले की ज्याला तुम्ही सामान्य भिकारी समजत आहात, तो प्रत्यक्षात करोडपती आहे? हे ऐकायला विचित्र वाटेल, पण हे शंभर टक्के खरं आहे. भारतात असे अनेक 'प्रोफेशनल' भिकारी आहेत, ज्यांनी भीक मागून करोडोंची माया जमवली आहे.
यांच्या लाइफस्टाईल आणि कमाईचे आकडे पाहून चांगल्या पगाराच्या नोकरीवाल्यांनाही लाज वाटेल. चला तर मग, आज भेटूया भारतातील अशाच ५ सर्वात श्रीमंत भिकारी व्यक्तींना आणि जाणून घेऊया त्यांच्या अविश्वसनीय श्रीमंतीची कहाणी.
१. भरत जैन: फक्त भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात श्रीमंत भिकारी!
नेट वर्थ (Net Worth): जवळपास ७.५ कोटी रुपये
या लिस्टमध्ये पहिलं नाव आहे भरत जैन यांचं. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि आझाद मैदान परिसरात भरत जैन यांना भीक मागताना पाहिलं जाऊ शकतं. गेल्या ४०-४५ वर्षांपासून ते हे काम करत आहेत. पण थांबा, त्यांना सामान्य भिकारी समजण्याची चूक करू नका!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भरत जैन यांची एकूण संपत्ती तब्बल ७.५ कोटी रुपये आहे. ते महिन्याला भीक मागून जवळपास ६०,००० ते ७५,००० रुपये कमावतात, म्हणजे दिवसाला साधारणपणे २००० ते २५०० रुपये. इतकंच नाही, तर त्यांनी हुशारीने गुंतवणूकही केली आहे. मुंबईत त्यांचे १.४ कोटी रुपयांचे दोन आलिशान फ्लॅट्स आहेत, जिथे त्यांचं कुटुंब आरामात राहतं. त्यांची मुलं कॉन्व्हेंट शाळेत शिकली आहेत. याशिवाय, ठाण्यात दोन दुकानं आहेत, ज्यातून त्यांना दरमहा ३०,००० रुपयांचं भाडं मिळतं. कुटुंब आता स्टेशनरीचा व्यवसायही सांभाळत आहे. आश्चर्य म्हणजे, एवढं सगळं असूनही भरत जैन आजही मुंबईच्या रस्त्यांवर भीक मागतात.
२. बर्जू चंद्र आझाद: मृत्यूनंतर उघड झाले श्रीमंतीचे रहस्य
मुंबईतील आणखी एक करोडपती भिकारी म्हणजे बर्जू चंद्र आझाद. त्यांची श्रीमंती त्यांच्या मृत्यूनंतर जगासमोर आली. एका रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाला. जेव्हा पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली, तेव्हा पोलिसांचे डोळे अक्षरशः विस्फारले.
त्यांच्या झोपडीवजा घरातून पोलिसांना लाखो रुपयांची रोख रक्कम, नाण्यांनी भरलेली पोती आणि बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटची कागदपत्रे सापडली. त्यांच्या नावावर लाखो रुपयांची एफडी (FD) होती. मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीचा आकडा समोर आल्यावर सर्वांनाच धक्का बसला होता.
Full Moon 2025 Astrology: ९ ऑगस्ट २०२५ ची पौर्णिमा ६ राशींना करणार मालामाल, तर ६ राशींसाठी धोक्याची घंटा; तुमची रास कोणती?
३. लक्ष्मी दास: बालपणापासून जमवली लाखोंची माया
कोलकात्याच्या लक्ष्मी दास यांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षापासून भीक मागायला सुरुवात केली. अनेक दशकांच्या मेहनतीनंतर आज त्यांची महिन्याची कमाई ३० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, जी अनेक फ्रेशर्सच्या पगारापेक्षाही जास्त आहे. त्यांनी सुरुवातीपासूनच पैशांची बचत करून बँकेत जमा केले आणि आज त्या आरामात आयुष्य जगत आहेत.
४. कृष्ण कुमार गीते: भाऊ सांभाळतो पैशांचा हिशोब
मुंबईच्या चर्नी रोड परिसरात कृष्ण कुमार गीते भीक मागतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते दिवसाला किमान १५०० रुपये कमावतात. त्यांची खासियत म्हणजे, ते आपला भाऊ सोबत ठेवतात, जो पैशांचं मॅनेजमेंट आणि हिशोब ठेवण्याचं काम करतो. या कमाईतून त्यांनी मुंबईत स्वतःचा एक फ्लॅटही खरेदी केला आहे, जिथे ते आपल्या भावासोबत राहतात. यावरून त्यांचा भीक मागण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किती 'प्रोफेशनल' आहे, हे दिसून येतं.
५. पप्पू कुमार: एकेकाळचा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, आज करोडपती सावकार!
नेट वर्थ (Net Worth): जवळपास १.२५ कोटी रुपये
पप्पू कुमार यांची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. पाटण्याच्या रेल्वे स्टेशनवर भीक मागणारे पप्पू कुमार एकेकाळी इंजिनिअरिंगच्या तयारीला लागले होते. पण एका अपघातात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आणि त्यांना शिक्षण सोडावं लागलं. त्यानंतर त्यांनी भीक मागायला सुरुवात केली.
आज पप्पू कुमार यांची एकूण संपत्ती सव्वा कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. भीक मागून त्यांनी इतके पैसे कमावले आहेत की, ते आता परिसरातील लहान व्यापाऱ्यांना व्याजावर कर्जही देतात. म्हणजे, ते आता एकप्रकारे सावकार बनले आहेत!
या कहाण्या वाचून एक गोष्ट स्पष्ट होते की, या लोकांनी परिस्थितीला शरण न जाता, भीक मागण्यालाच आपला 'व्यवसाय' बनवले आणि त्यातून करोडोंची संपत्ती उभी केली. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या भिकाऱ्याला पाहाल, तेव्हा तुमच्या मनात नक्कीच प्रश्न येईल, "हा खरंच गरजू आहे की माझ्यापेक्षा श्रीमंत?"
0 टिप्पण्या