Coolie Vs War 2 Box office collection:भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन मोठे सुपरस्टार, हृतिक रोशन आणि 'थलायवा' रजनीकांत, यांचे चित्रपट 'वॉर २' आणि 'कुली' उद्या, म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी, बॉक्स ऑफिसवर एकमेकांशी भिडणार आहेत. या मोठ्या क्लॅशपूर्वीच, बॉक्स ऑफिसवरील नाट्यमय घडामोडींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका बाजूला यशराज फिल्म्सने (YRF) 'वॉर २' साठी देशातील बहुतांश स्क्रीनवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे, तर दुसऱ्या बाजूला मर्यादित स्क्रीन मिळूनही रजनीकांतच्या 'कुली'ने एडवांस बुकिंगमध्ये धुमाकूळ घातला आहे.
YRF चा 'मास्टरप्लॅन' आणि स्क्रीनचा खेळ
'वॉर २' च्या निर्मात्यांनी, म्हणजेच यशराज फिल्म्सने, आपली ताकद वापरत एक जबरदस्त रणनीती आखली. रिपोर्ट्सनुसार, YRF ने भारतातील जवळपास सर्व सिंगल स्क्रीन, डबल स्क्रीन आणि ट्रिपल स्क्रीन थिएटर्समधील १०० टक्के शोज आपल्या चित्रपटासाठी बुक केले. यामुळे रजनीकांत स्टारर 'कुली'ला फक्त मोठ्या मल्टिप्लेक्समध्ये एखाद-दुसरा शो मिळत होता. YRF चा हा 'मास्टरस्ट्रोक' 'कुली'च्या कमाईवर मोठा परिणाम करेल, असे चित्र सुरुवातीला दिसत होते.
'थलायवा' फॅन्सचा पॉवर, पलटली बाजी!
पण म्हणतात ना, पब्लिक डिमांडपुढे कुणाचे चालत नाही! स्क्रीनच्या या खेळात पिछाडीवर असूनही, 'कुली'ने एडवांस तिकीट बुकिंगमध्ये 'वॉर २' ला मागे टाकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. चित्रपट प्रदर्शनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना, सुरुवातीला ८ कोटींची ओपनिंग कमाई करेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला 'कुली' आता या आकड्याच्या खूप पुढे निघून गेला आहे.
एका थिएटर मालकाने दिलेल्या माहितीनुसार, "आम्हाला YRF कडून 'कुली'ला एकही शो न देण्याचे सक्त आदेश होते. पण रजनीकांतच्या चाहत्यांची आणि सामान्य प्रेक्षकांची प्रचंड मागणी पाहता, आम्हाला आमचा निर्णय बदलावा लागला. आता आम्ही 'कुली'चे देखील दोन शोज लावत आहोत." यावरून 'थलायवा'च्या स्टारडमची ताकद स्पष्ट दिसते.
Coolie Cast Fees: कुली साठी रजनीकांतने घेतली एवढी फीस आकडा पाहून व्हाल थक्क;बघा किती घेतली फीस
बॉक्स ऑफिसवर आता खरा 'वॉर'! कोण मारणार बाजी?
सध्याच्या एडवांस बुकिंगच्या आकड्यांवर नजर टाकल्यास 'कुली' स्पष्टपणे आघाडीवर दिसत आहे. तथापि, हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्ये हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरच्या 'वॉर २' ची क्रेझ अजूनही कायम आहे. त्यामुळे, रिलीज झाल्यानंतर 'वॉर २' च्या कलेक्शनमध्ये मोठी झेप बघायला मिळू शकते.
हा संघर्ष केवळ दोन चित्रपटांचा नाही, तर YRF सारख्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसच्या कॉर्पोरेट रणनीती विरुद्ध रजनीकांतच्या अफाट फॅन फॉलोइंगचा आहे. स्क्रीन जास्त असूनही 'वॉर २' पिछाडीवर का? आणि कमी स्क्रीन मिळूनही 'कुली' सुसाट कसा? या प्रश्नांची उत्तरे उद्या, म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी, दोन्ही चित्रपटांच्या ओपनिंग डे कलेक्शननंतरच मिळतील. हा बॉक्स ऑफिस क्लॅश कोण जिंकणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या