मराठी चित्रपटसृष्टीतून करिअरला सुरुवात करून हिंदी मालिकांमध्ये आपली छाप पाडणारी लोकप्रिय अभिनेत्री नारायणी शास्त्री सध्या तिच्या वैयक्तिक निर्णयामुळे चर्चेत आहे. समाजातील परंपरागत अपेक्षांना धक्का देत नारायणीने स्पष्ट केलंय की ती आई होणार नाही, कारण तिला तिचं अभिनय करिअर थांबवायचं नाही.
नारायणी शास्त्री हिला पक पक पकाक या मराठी चित्रपटातून ओळख मिळाली होती. सध्या ती हिंदी टेलिव्हिजन मालिकांमध्ये सक्रिय असून तिच्या अभिनय कौशल्याची दखल प्रेक्षक घेत आहेत. पण तिच्या खासगी आयुष्यात घेतलेल्या एका निर्णयामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
एका मुलाखतीत नारायणीने स्पष्ट सांगितले की, आई होणे ही एक जबाबदारीची गोष्ट आहे, जी तिला स्वीकारायची नाही. “मला माहित आहे की जर मी आई झाले, तर मला काही काळासाठी काम थांबवावं लागेल – आणि मी ते करू इच्छित नाही,” असं ती म्हणाली.
नारायणीचा हा निर्णय केवळ तिचा वैयक्तिक नाही तर पती स्टीव्हन ग्रेव्हल यांच्यासोबत चर्चा करून घेतलेला आहे. “आम्ही दोघंही या निर्णयावर एकमत आहोत. आम्हाला आमचं आयुष्य मुलांशिवायही आनंदी आणि पूर्ण वाटतं,” असं ती म्हणते.
0 टिप्पण्या