Ticker

6/recent/ticker-posts

रिंकू राजगुरूच्या पहिल्या प्रेमाची गोष्ट! या नात्याबाबत अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य



Rinku Rajguru Love Life: 'सैराट' फेम, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) तिच्या अभिनयाने आणि सडेतोड मतांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच तिच्या आगामी 'बेटर हाफ' या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिने प्रेम, लग्न आणि रिलेशनशिप्सवर (love and relationships) काही आश्चर्यकारक विधानं केली आहेत, 

ज्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. तिचा नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तिने सांगितलेला एक मजेशीर किस्सा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

"प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीला आहे तसं स्वीकारणं"

प्रेमाची व्याख्या विचारली असता, रिंकूने अत्यंत साध्या आणि सरळ शब्दात आपलं मत मांडलं. ती म्हणाली, "माझ्यासाठी प्रेम म्हणजे आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, ती जशी आहे तशी तिला स्वीकारणं. त्यात कोणताही बदल करण्याची अपेक्षा न ठेवणं."

 मात्र, जेव्हा तिला विचारण्यात आलं की पहिलं प्रेम म्हणजे काय? तेव्हा तिने प्रांजळपणे कबूल केलं की, "माझं तसं काही झालंच नाहीये, त्यामुळे मला त्याबद्दल काहीच माहिती नाही." तिच्या या उत्तराने अनेकांना आश्चर्य वाटले. आई-बाबांचं प्रेम हेच तिच्यासाठी सर्वस्व असल्याचं तिने नमूद केलं.

"आता माझा कशावरच विश्वास नाही, ना रिलेशनशिपवर..."

आजच्या काळातल्या रिलेशनशिप्सबद्दल बोलताना रिंकूने एक धक्कादायक विधान केलं. ती म्हणाली, "सध्या माझा कशावरतीच विश्वास नाहीये. ना रिलेशनशिपवर, ना कुठल्या शिपवर. मला हे नक्की काय असतं हेच माहिती नाहीये."

 तिच्या या विधानामुळे 'सैराट'मध्ये आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू खऱ्या आयुष्यात प्रेमाबद्दल इतका वेगळा विचार का करते, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी होते का? जाणून घ्या ऐतिहासिक पुरावे आणि सत्य

लिव्ह-इन की लग्न? रिंकूने दिलं स्पष्ट उत्तर

जेव्हा रिंकूला लिव्ह-इन रिलेशनशिप आणि लग्न (live-in vs marriage) यापैकी काय योग्य वाटतं असं विचारण्यात आलं, तेव्हा तिने क्षणाचाही विचार न करता 'लग्न' असं उत्तर दिलं. 

यामागे तिने आपल्या पारंपरिक विचारांचा दाखला दिला. "आपल्याकडे परंपरेने हेच चालत आलं आहे. माझ्या आई-वडिलांनीही लग्नच केलं, त्यामुळे माझ्यासाठी लग्नच योग्य आहे," असं परखड मत तिने मांडलं.

रिंकू राजगुरूची (rinku rajguruch premavishaich mat) ही मतं तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच अनपेक्षित आहेत. एकीकडे तिच्या चित्रपटांमधून ती प्रेमाच्या विविध छटा साकारत असताना, खऱ्या आयुष्यात मात्र तिचा नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आणि अधिक वास्तववादी दिसतो. 

तिचा आगामी चित्रपट 'बेटर हाफ' (Better Half movie) आता या मतांनंतर आणखी चर्चेत आला आहे, जो एका जोडप्याच्या नात्यातील गंमतीजमतींवर आधारित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या