मुंबई: भारतीय टेलिव्हिजनची 'लाडकी सून' तुळशी विराणी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2' मधून छोट्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन केले आहे. पण या कमबॅकची सर्वात मोठी चर्चा त्यांच्या मानधनाची होत आहे, ज्याने संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडवून दिली आहे.
इंडस्ट्रीत नवा रेकॉर्ड, फी ऐकून व्हाल थक्क!
मिळालेल्या माहितीनुसार, स्मृती इराणी या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडसाठी तब्बल ₹14 लाख रुपये मानधन घेत आहेत. या आकड्यासह त्या भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री ठरल्या आहेत. सध्याची टॉप अभिनेत्री, 'अनुपमा' फेम रुपाली गांगुली (₹3 लाख प्रति एपिसोड) आणि हिना खान (₹2 लाख प्रति एपिसोड) यांच्यापेक्षा ही रक्कम कित्येक पटीने जास्त आहे.
यावर बोलताना स्मृती इराणी यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले की, हे मानधन त्यांच्या अनुभवाचे आणि यशाचे प्रतीक आहे. त्या म्हणाल्या, "जेव्हा तुम्ही सातत्याने उत्तम रिझल्ट्स देता, तेव्हा तुम्हाला तुमच्या हक्काचे मानधन मागण्याचा अधिकार असतो. मी फक्त समान मानधनासाठी नाही, तर मुलं आणि मुली दोघांनाही मागे टाकून हे स्थान मिळवले आहे, ज्यामागे प्रचंड मेहनत आहे."
खालिद का शिवाजी: एका सिनेमाने महाराष्ट्रात पेटवला वाद, सरकारही मैदानात! नक्की काय आहे हे प्रकरण?
त्यांच्या मते, खरा स्टार तोच असतो जो आपल्यासोबत इतरांनाही मोठे करतो आणि त्यांच्या पुनरागमनामुळे मालिकेतील इतर कलाकारांचीही व्हॅल्यू वाढेल. स्मृती इराणींच्या या 'रॉयल कमबॅक'ने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये एक नवीन बेंचमार्क सेट केला असून, आता सर्वांच्या नजरा 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2' च्या यशाकडे लागल्याआहेत.
0 टिप्पण्या