Gold rate today 13 August 2025: गेल्या दोन दिवसांपासून स्वस्त होत असलेल्या सोन्या-चांदीच्या दरांनी आज (बुधवार, १३ ऑगस्ट) पुन्हा उसळी घेतली आहे. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय बाजारातही तेजी दिसून येत आहे. खरेदीदार आणि गुंतवणूकदार दोघांसाठीही आजचे नवे दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
आजचे सोन्याचे दर (Gold Price Today)
आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर १० ग्रॅम सोन्याचा भाव १०३ रुपयांनी वाढून ९९,७२३ रुपयांवर पोहोचला आहे. तर, पुण्यासारख्या स्थानिक सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर १०० रुपयांनी वाढून १,००,३५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. याशिवाय, २२ कॅरेट सोन्यासाठी तुम्हाला ९१,९९० रुपये आणि १८ कॅरेट सोन्यासाठी ७५,२६० रुपये मोजावे लागतील.
चांदीही झाली महाग (Silver Price Today)
सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. MCX वर १ किलो चांदीचा भाव ७२३ रुपयांनी वाढून १,१४,४७० रुपयांवर गेला आहे. सराफा बाजारात चांदी ८५० रुपयांनी महाग झाली असून, आजचा दर १,१४,६६० रुपये प्रति किलो आहे.
गोल्ड लोन घेताय? थांबा! गोल्ड लोन घेताना या १० गोष्टीचा विचार नक्की करा
दरवाढीचे कारण काय?
आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकन डॉलरच्या मूल्यात झालेली घट आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत. याचा थेट परिणाम म्हणून सोन्या-चांदीच्या मागणीत आणि दरात वाढ झाली आहे. आगामी सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यास दरांमध्ये आणखी चढ-उतार दिसू शकतात. कालच्या तुलनेत आजची वाढ लक्षणीय असून खरेदीदारांनी दरांवर लक्ष ठेवणे फायद्याचे ठरू शकते.
0 टिप्पण्या