स्वातंत्र्य दिन २०२५ विशेष:मोहम्मद अली जिन्ना हे केवळ पाकिस्तानचे राष्ट्रपिताच नव्हते, तर आपल्या काळातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. राजकारणात जितके ते धूर्त होते, तितकेच पैशाच्या बाबतीतही त्यांचे डोके चालत असे.तर चला बघुया किती होती तरी मोहम्मद जिन्ना यांची संपत्ती.
वकिलीतून लाखोंची कमाई
जिन्ना हे त्या काळातील सर्वात महागडे वकील होते. एका केससाठी ते तब्बल १,५०० रुपये फी घेत असत, जी आजच्या काळात लाखोंची रक्कम आहे. त्यांच्या कमाईचा मुख्य स्त्रोत हा त्यांचा वकिलीचा व्यवसाय होता, ज्यामुळे त्यांनी प्रचंड संपत्ती जमवली.
गुंतवणुकीचे 'मास्टर'
जिन्ना एक हुशार गुंतवणूकदार होते. शेअर बाजार आणि प्रॉपर्टीमध्ये त्यांची मोठी गुंतवणूक होती. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे, फाळणीच्या काळात जेव्हा सगळीकडे अशांतता होती, तेव्हा त्यांनी टाटांच्या 'एअर इंडिया' कंपनीचे ५०० शेअर्स खरेदी केले होते. यावरून त्यांची गुंतवणुकीची अचूक दृष्टी दिसून येते.
अफाट मालमत्ता
मुंबईतील मलबार हिल येथील 'जिन्ना हाऊस' आणि दिल्लीतील बंगला ही त्यांच्या अफाट मालमत्तेची साक्ष आहे. फाळणीपूर्वी त्यांनी अत्यंत हुशारीने आपली बहुतांश संपत्ती (जवळपास ८ लाख रुपये) पाकिस्तानातील बँकेत हलवली होती.
देशाचा पुढचा उपराष्ट्रपती कोण? मोदी-नड्डा यांनी सुचवले नावे हे होऊ शकतात नवे उपराष्ट्रपती ?
किती होती एकूण संपत्ती?
अंदाजानुसार, मृत्यूपूर्वी जिन्नांची एकूण संपत्ती सुमारे ५० मिलियन डॉलर्स इतकी होती. त्यांच्या मृत्यूनंतर ही संपत्ती त्यांची बहीण फातिमा जिन्ना यांना मिळाली. थोडक्यात, जिन्ना हे राजकारणासोबतच आर्थिक नियोजनाचेही 'बादशाह' होते.
0 टिप्पण्या